तालुक्यात अद्यापही अनेक शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदाना पासुन वंचित
चाकुर ता.प्रः-चाकुर तालुक्यात मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने भरपाई पोटी अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही धर्माबाद तालुक्यातील शेतक- यांचे वाटोळे होत असल्यामुळे गेल्या अतिवृष्टीचा कार्यकाळात शेतकऱ्यांच्या शेतातील मुसळधार पावसाने पिकाच्या अतोनात – नुकसान झाले आणि प्रशासनाने झालेल्या अतिवृष्टी मध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान पंचनामे केले होते. त्याच अनुषंगाने शासन
स्तरावरणातील नुकसानीचे रक्कम तालुक्यासाठी मंजूर झाल्याने सदरील अनुदान रक्कम डी.बी.टी. प्रणालीद्वारे आजही शेतकरी मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत आधार प्रमाणिकरण ईकेवायसी करून शेतकऱ्यांकडे पावती सुद्धा आहे पण अद्याप अनुदानाची रक्कम खात्यामध्ये जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे झालेल्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यात आले अगदी अल्प शेतकऱ्यांचे व्हीके नंबर प्राप्त झाले असून उर्वरित बहुतांश शेतकरी आजही व्हीके नंबर अनुदान पासून वंचित ठेवल्या जात आहेत शेतकऱ्यांची माहिती अपलोड करून विके नंबर प्राप्त करून घेण्यासाठी शेतकरी दिसत आहेत चाकुर तालुक्यातील – शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असे सांगण्यात येत आहे. मकरसंक्रांती सणानिमित्त शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळेल अशी अपेक्षा होती पण ईकेवायसी झाल्याच्या नंतर सुध्दा शेतकऱ्यांना त्या अनुदानाचा कसल्याच प्रकारचा अद्यापही आज फायदा होत नसल्याने शेतकरी राजा चिंतेत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे प्रशासनाने – शेतकऱ्यांसमोर ईकेवायसी चा घोडा अडकून ठेवल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा अंगठा येत नाही अंगठा न येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध योजनाची अनुदानाची ॥ रक्कम मिळणार का ? असा सवाल
चाकुर तालुक्यातून शेतकऱ्यांकडून संताप जनक प्रश्न ? शासन म्हणते ई केवायसी करा शेतकरी म्हणतात ईकेवायसी केली खात्यामध्ये पैसे जमा करा शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली पण गतिमान शासन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा करणार असा संताप जनक प्रश्न ? शासनाला धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यातून विचारण्यात येत आहे.अंगठा न येणाऱ्या शेतकऱ्यांकडून गतिमान शासनाला संताप जनक प्रश्न ? वारंवार चकरा मारत शेतकरी अनुदानापासून बंचित असताना दिसून येत आहेत तरीसुद्धा प्रशासन त्यावर तोडगा काढण्यासाठी कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने लवकरात लवकर अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जमा करण्यात यावी शेतकऱ्यांकडून अशी मागणी होत आहे गोरगरीब जनसामान्य माणसासह शेतकऱ्यांतून मागणी केली जात आहे शेतकयांचा अंगठा येत नसल्यामुळे शेतकरी हैराण आहेत ईकेवायसीचा फटका बँकेत अनुदान जमा होईल का? शेतकऱ्यांना विविध योजनेचे अनुदान मिळावे सरकार पर्याय काढेल का? त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक बाबींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय शासन दूर करेल का ? तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर अतिवृष्टी अनुदानाचे रक्कम खात्यामध्ये तात्काळ जमा करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहे.

