Thursday, January 22, 2026
spot_imgspot_img
Homeमहत्वाचेमुंबईत आझाद मैदानावर शिक्षकांच्या विविध मागण्याचा परिपाठ- राज्य नेते माधव लातुरे

मुंबईत आझाद मैदानावर शिक्षकांच्या विविध मागण्याचा परिपाठ- राज्य नेते माधव लातुरे

    माधव लातुरे – राज्य नेते

टीईटीटी सक्तीपासून मुक्तीसाठी सोमवारी 08 डिसेंबर रोजी शिक्षकांचे मुंबईत प्रार्थना आंदोलन.

प्रतिनिधी/-

राज्यातील शिक्षकांची टीईटी सक्तीपासून मुक्ती व्हावी,यासाठी सोमवारी दि.08 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शिक्षणमंत्री यांच्यासह राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती तर्फे मुंबई येथे आझाद मैदानावर शिक्षकांच्या मागण्यांचा परिपाठ व प्रार्थना आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य नेते माधव लातूरे यांनी दिली.राज्यात टीईटी साठी दाखल झालेल्या याचिकांवर अन्यायकारक निर्णय झाल्यानंतर अनेक समस्या निर्माण करून,या समस्यामुळे शिक्षकांना अडकवून संपूर्ण राज्यातील शासनाकडून चालविल्या जात असलेल्या शाळा बंद पडण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत आहेत गरिबांची मुले ही शाळाबाह्य होत आहेत. ह्या प्रार्थना आंदोलनासह संपूर्ण राज्यभर विविध ठिकाणी मोर्चे,धरणे आंदोलन सुरू आहेत. शिक्षक वर्गास वेठीस धरून फसविण्याची काम शासन करत आहे. त्यामुळे शाळा व शिक्षकांच्या समस्या बाबत तोडगा काढावा, या व इतर मागण्यांसाठी राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती प्रसाद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक अध्यक्ष दिलीपराव ढाकणे, राज्य शिक्षक नेते शिवाजीराव साखरे, राज्य नेते अंकूश काळे, माधव लातुरे,रामदास सांगळे,तसेच महिला आघाडी च्या राज्य नेत्या मुक्ता पवार,महीला राज्य प्रमुख सुषमा राऊतमारे,माध्यमिक विभाग प्रमुख सतिश कोळी व इतर मुख्य पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 08 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता आझाद मैदानावर प्रार्थना करून शिक्षकांच्या मागण्यांचा परिपाठ आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात प्रत्येक जिल्ह्यातून हजारो शिक्षक बंधू भगीनीं सहभागी होणार आहेत.टीईटी परिक्षा रद्द करणे,चुकीची संचमान्यता,इतर शिक्षक समस्यांवर मार्ग काढावा,व जूनी पेन्शन लागू करा,शिक्षकांच्या अन्यायकारक काही चुकीच्या बदल्या, केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी,मुख्याध्यापक पदोन्नती,या प्रलंबित मागण्या व शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, व आॅनलाईन टप्पे,विविध अॅप वरून भरावयाची ही कामे बंद करा इतर मागण्यांसाठी हे प्रार्थना व गुरूजींच्या मागण्यांचा परिपाठ आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व जिल्ह्यातील 09 हजार पेक्षा जास्त प्राथमिक , माध्यमिक,खाजगी शाळांतील हजारो शिक्षक बंधू भगीनीं उपस्थित राहतील अशी माहिती राज्य नेते माधव लातुरे यांनी दिली.टीईटी परिक्षा रद्द करा साठी,व 15 मार्च 2024 च्या संचमान्यतेला विरोध म्हणून राज्यात सर्व जिल्हास्तरावर राज्य समन्वय शिक्षक संघटना यांचे वतीने 09 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.आता अंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून हे परिपाठ व प्रार्थना अंदोलनाने आझाद मैदानावर यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधून मागण्या मान्य करून घेण्यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावरही शासनाने मागण्या कडे लक्ष नाही दिल्यास व मागण्या पुर्ण नाही.केल्यास पुढील अदोलंन हे संपूर्ण राज्यव्यापी प्रत्येक जिल्ह्यात करून अधिक तिव्र करू असेही प्रतिनिधी शी बोलताना सांगितले…आता शासन या अंदोलनाची काय दखल घेईल.. मागण्या मान्य करेल का? की शिक्षकांचे अंदोलन अधिक तिव्र होवून दिल्लीपर्यंत जाणार… या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments