Saturday, December 6, 2025
spot_imgspot_img
Homeमहत्वाचेजनतेच्या प्रश्नांसाठी तन,मन,धनाने झटनारा,रोखठोक व परखड पत्रकार व अॅंकर श्रीयुत विलास बडे

जनतेच्या प्रश्नांसाठी तन,मन,धनाने झटनारा,रोखठोक व परखड पत्रकार व अॅंकर श्रीयुत विलास बडे

जनतेच्या प्रश्नांसाठी तन,मन,धनाने झटनारा,रोखठोक व परखड पत्रकार व अॅंकर श्रीयुत विलास बड

दिपावलीच्या निमित्ताने चापोली ता.चाकूर येथे श्रीयुत विलास बडे यांची एक अनोखी खास भेट.

🔵”लोकमत न्युज 18 बडे मुद्दे” चे उत्कृष्ट अॅकर सन्माननीय श्री.विलास बडे यांचा चापोलीत जाहीर सत्कार…🟠

चाकूर प्रतिनिधी :-दि.22/10/2025 रोज बुधवारी सायंकाळी 4:00 वाजता सन्माननीय श्री.विलास माणिकराव बडे “लोकमत न्युज 18 बडे मुद्दे” चे रोखठोक व परखड भुमिका मांडणारे पत्रकार तथा अॅकर हे चाकूर तालूक्यातील रहीवाशी असल्याने चाकूर/ अहमदपूर तालूक्यात एका खासगी कार्यक्रमा निमित्ताने दोन दिवस दौर्‍यावर आले असता यांनी चापोलीतील श्री.गोविंदराव चाटे व श्री.माधव लातूरे यांच्या दिपावली फराळाच्या निमित्ताने निमंत्रणास मान देवून श्री गोविंद चाटे यांच्या नुतन “गजराई निवास” येथे भेट दिली.या वेळी सन्माननीय श्री.विलास बडे यांच्या सोबत त्यांचे पिताश्री माजी सभापती पं समीती चाकूर श्री.माणिकराव बडे,त्यांचे छोटे बंधू मा.श्री.विवेक माणिकराव बडे राजस्थान येथे वनविभागात IFS Officer या पदावर (श्रेणी एक) म्हणून कार्यरत असलेले,त्यांचे मित्र अॅड श्री.विनोद शंकरराव चाटे मुंबई हायकोर्टात सेवारत असलेले,आणि मुळकी ता.अहमदपूर चे माजी सरपंच श्री.राजकुमार मुंढे,श्री.किशोर चाटे,श्री.वैजनाथ गरडे,साॅफ्टवेअर इंजिनिअर पुणे श्री. रामेश्वर केंद्रे इत्यादी उपस्थित होते.भेटीदरम्यान यावेळी सर्व उपस्थितांचे गावकरी चापोलीकर यांचे वतीने शाल,श्रीफळ,पुष्पहार देवून स्वागत कयण्यात आले व दिपावली 2025 च्या निमित्ताने शुभेच्छा देवून भावी आयुष्यासाठी शुभकामना देण्यात आल्या…सर्व प्रथम चाकूर पंचायत समिती चे माजी सभापती श्री. विलास बडे यांचे वडील यांचे मा.श्री.माणिकराव बडे यांचा स्वागत सत्कार श्री प्रभाकर व्होनराव व श्री दत्तात्रय कुलकर्णी (चापोलीकर) यांनी केले,बडे मुद्दे चे सुत्रसंचालक तथा एक आदर्श पत्रकार,प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर व चिखलात जावून त्यांचे दू:ख मिडीयातून व्यक्त करून मदत मिळवून देणारे,जिल्हा परिषद शाळा,विद्यार्थी व शिक्षक यांचे कैवारी श्रीयुत विलास माणिकराव बडे यांचा स्वागत सत्कार श्री. गोविंद चाटे आणि भागवत चाटे यांनी केला,अॅड विनोद शंकरराव चाटे मुंबई हायकोर्टात सेवारत असलेले वकील यांचा सत्कार श्री.सुरेश मल्लीशे शेतकरी व श्री. शिवाजी चाटे माजी सैनिक यांनी केला,मा.श्री. विवेक माणिकराव बडे lFS आॅफिसर राजस्थान येथे कार्यरत यांचा स्वागत सत्कार श्री.शिवकांतप्पा तरगुडे यांनी केले.,श्री.किशोर चाटे यांचा सत्कार श्री. प्रभाकर व्होनराव यांनी तर श्री वैजनाथ गरड यांचा सत्कार कृष्णा चाटे व शंकर चाटे यांनी केला.मुळकी ता अहमदपूर चे माजी सरपंच श्री. राजकुमार चाटे यांचा सत्कार श्री.रमेश पाटील यांनी केला.,व श्री रामेश्वर केंद्रे साॅफ्टवेअर इंजिनिअर पुणे यांचा स्वागत सत्कार गुणगौरव करून श्री.माधव लातूरे यांनी केला.याच बैठकीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती चापोली येथील गेल्या 15 वर्षापासून बिनविरोध राहीलेले व गावाचे तंट्टे, तक्रारी पोलीस स्टेशन पर्यत न जावू देता गावातच मिटवून संपूर्ण गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी…कमी शिक्षण असूनही आदर्श कार्य केलेले माजी अध्यक्ष मा.श्री.प्रभाकर शंकरराव व्होनराव(आण्णा) यांच्या कार्याचा गौरव करून सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री.विलास बडे यांनी आपल्या शुभहस्ते जाहीर सत्कार करून त्यांना व चापोली गावाच्या विकासासाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या…तसेच संत ज्ञानेश्वर ज्युनीयर काॅलेज चापोली चे अध्यक्ष तथा माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद विद्यालय चापोली श्री दत्तात्रय कुलकर्णी (चापोलीकर) यांचाही गावात ज्युनीयर काॅलेज ची सोय करून येथे क्राफ्ट सायन्स,कॅम्पुटर सायन्स,इलेक्ट्रॉनिक सायन्स सारखे महत्वपूर्ण विषय आनून “12 वी” साठी चापोलीत परिक्षा सेंटर ला शासन मान्यता आणल्या बद्दल बडे मुद्दे चे मा.श्री.विलास बडे यांचे शुभहस्ते जाहीर सत्कार करून पुढील कार्यास शुभकामना दिल्या.जमलेल्या सर्व पाहुणे मंडळी व चापोली गावकरी यांनी एकमेकास दिपावली 2025 च्या निमित्ताने शुभकामना दिल्या…व चापोली येथील स्विट मार्ट चे संचालक संदीप भैया आबंदे याने दिवाळी निमित्ताने एक स्पेशल स्विट पदार्थ व भेटवस्तू श्री.विलास बडे यांना दिला….श्री कृष्णा केंद्रे यांचा सत्कार ग्रा पं सदस्य चापोली माऊली चाटे यांनी केला.शेवटी दिपावली फराळ व चहापाण नंतर चापोली गाव हे तालूक्यातील एक जवळपास 10 हजार लोकवस्ती चे गाव आहे. येथील जिल्हा परिषद शाळा स्वच्छ सुंदर व गुणवत्ता संपन्न आहे. एक सर्व धर्म समभाव असलेले,सर्व समावेशक अशी येथील परंपरा सुख,समृद्धी व आनंदाने जनता नांदत असलेले गाव म्हणून यावर सांगोपांग चर्चा,शेतकरी यांचे अतिवृष्टी,पुर परीस्थिती व कर्जमाफी यावर ही सविस्तर चर्चा झाली,शाळा व विद्यार्थी,शिक्षक आणि शासन व प्रशासन यांच्या विविध प्रकारच्या योजना व धोरणे,निवडणूका,सण त्योहार,पाऊस पाणी,आणि प्रत्येक लेकरांना उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण द्याअसे जाहीर आवाहन बैठकीत श्री बडे यांनी सर्वांना केले.जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहीजेत या साठी सर्वांनी मदत करा,त्या टिकल्या नाही तर गरीब,होतकरू,हुशार मुलांना मोफत शिक्षण भेटणार नाही.करीता पुढील काळात पालक व सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन श्री बडे यांनी केले.तसेंच न्यायालय व शासन शिक्षक यांना सक्तीने 54/55वर्ष वय किंवा 30वर्ष सेवा असलेल्यांना सेवानिवृत्त करणे,सर्व परिक्षा घेवून नोकरीस घेतलेल्या शिक्षक यांना टी ई टी सारखी परिक्षा पुन्हा मानगुटीवर ठेवून दोन वेळेत पास नाही झाल्यास सक्तीने नोकरीतून कमी करणे व चुकीची संचमान्यता आणि इतर जाचक नियम अटी व दररोज चे शाळा बाह्य कामे शिक्षक यांना लावून सरकारी शाळा बंद करण्याचा घाट शासन घालताना दिसत आहे. यावरही सकारात्मक मतमतांतरे झाली. विद्यार्थी यांच्या शिक्षणाविषयी शासनाच्या विविध योजना याची माहिती पालक व संबधीतांना असली पाहिजे,शिक्षणाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि पालक यांची होत असलेली लूट /होरपळ या बाबत पालकांनी जागृत होणे गरजेचे आहे,सध्या चे शिक्षण,कायदा, सुव्यवस्था,या व इतरही सर्व विषयावर सर्व पाहुणे मंडळी व गावकरी यांच्यात प्रदिर्घ एक तासापेक्षा जास्त वेळ विचारमंथन झाले. सर्व चापोलीकर यांना भेटून मला अपार आनंद झाला,मी पुढील भेटी वेळी मुद्दाम जास्तीचा वेळ काढून भेटीसाठी नक्की येणार अशा प्रतिक्रिया,भावना सन्माननीय विलास बडे व उपस्थित पाहुणे यांनी सर्वांसमोर व्यक्त केल्या.

 या सर्व स्वागत सत्कार व चर्चा सत्राचे अभ्यासपुर्ण सुत्रसंचालन श्री.माधव लातूरे यांनी केले.

शेवटी एवढ्या व्यापातून व मग्नतेतून “लोकमत न्युज 18 बडे मुद्दे” चे महाराष्ट्र व देशात काही ठिकाणी परिचीत असलेले व त्यांच्या बातम्या आपण सर्व जन अवर्जून पहातो,ऐकतो असे मा.श्री.विलास माणिकराव बडे त्यांचे सोबत आलेले सर्व पाहुणे मंडळी यांचे चापोली ग्रामस्थ व मित्रपरिवार यांच्या वतीने श्री रमेश पाटील युवा नेता यांचे कडून मनःपुर्वक आभार मानण्यात आले.

मुख्य संपादक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments