🟨
🟡सामाजिक कार्यकर्ते आयु शिलरत्न नवनाथ गायकवाड हे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य पॅथर युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा अविष्कार पोलीस मित्र संघटना मराठवाडा विभाग औरंगाबाद चे संपर्क प्रमुख श्रीयुत आयु.गायकवाड शिलरत्न नवनाथ यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक,व संघटनात्मक,एक हात मदतीचा गरीब होतकरू विद्यार्थ्यांना व पिडित गरवंतांना मदत करणे,अन्यायाविरूद्ध, भ्रष्टाचाराला वाचा फोडून याचना कर्ते, न्याय मागणी करणारे यांना अंदोलन, उपोषणे, लढा उभारून आधार देवून न्याय मिळवून देणे या कामी आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेवून “शिवश्री प्रतिष्ठान पुणे” च्या वतीने संस्थापक तथा संचालक श्रीयुत मदनगडे पाटील व सिनेतारका प्रतिक्षा जाधव यांचे शुभहस्ते दि 26/10/2025 रोजी समृद्धी मंगल कार्यालय आळंदी देवाची पुणे येथे 11:00वाजता असंख्य सामाजिक व विविध क्षेत्रातील कामे करणारे समाज सेवक व हजारो उपस्थितांच्या हजेरीत श्री शिलरत्न गायकवाड यांच्या कार्याचा गुणगौरव व मानसन्मान आणि शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र,पुष्पहार देवून जाहीर सत्काराने गौरविण्यात आले.या वेळी मान्यवर,कुटुंबातील सर्व सदस्य,पाहुणे,मित्रपरिवार उपस्थित होते.श्रीयुत शिलरत्न गायकवाड हे उदगीर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय केलेल्या कामगिरी बद्दल मिळालेल्या या मानाच्या राज्य स्तरावरील पुरस्कारामुळे त्याचे विविध ठिकाणी सत्कारमूर्ती श्री गायकवाड यांचा सत्कार,कौतुक, मानसन्मान करून,त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.आणि त्यांच्या पुढील उत्तुंग कार्यास आभाळभर शुभकामना देण्यात येत आहेत.आयु.शिलरत्न नवनाथ गायकवाड हे प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले की मला माझ्या आजवरच्या कार्याची दखल घेवून हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मला या संस्थेने बहाल करून माझ्या कार्याचा गौरव व मानसन्मान केला त्या बद्दल मी शिवश्री प्रतिष्ठान पुणे आणि त्यांचे संस्थापक श्री मदनगडे पाटील यांचे आणि सर्व शुभेच्छा देवून माझ्या पुढील कार्यास शुभेच्छा देवून कौतुक करणारे व शुभकामना देणारे यांचे आभार मानत आहे. निश्चितच मला आपल्या शुभेच्छा मुळे पुढील आयुष्यासाठी बळ मिळणार आहे.असे माझे विविध क्षेत्रातील कार्य या पुढे ही चालूच राहील यात तिळमात्र शंका नाही अशा भावना व्यक्त केल्या.
