लातूर प्रतिनिधी :
आज दि. २३/०१/२०२५ रोजी मौ. मुरुड ता. जि. लातूर येथे ग्रामपंचायत मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्रुदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.
तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी श्री. महेश कणसे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओडिसा येथील कटक शहरात झाला सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंद यांना आपले गुरु मानायचे त्यांच्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता होती देशाला गुलामगिरीतुन मुक्त करण्याची त्यांच्यात जिद्द होती त्यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य देशाच्या सेवेसाठी समर्पित केले. नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. तसेच त्यांनी दिलेला “जयहिंद” का नारा हे वाक्य पुर्ण भारतीय ठरले “ तुम मुझे खुन दो मैं तुम्हे आझादी दुंगा” हा नारा राष्ट्रीय ठरला.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी बोलत असताना महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंग चित्रकार होते तसेच सामना या मराठी दैनिकाचे संस्थापक होते. त्याच बरोबर त्यांनी १९६० म्ध्ये मार्मिक साप्ताहिक सुरु केले. त्यांनी १९६६ मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रात अनेक उद्योग असुनही मराठी माणुस बेरोजगार आणि गरीब आहे. हे त्यांनी जनतेला दाखऊन दिले त्या दिशेने काम करुन अनेक मराठी माणसांना रोजगार उपलब्ध करुन दिला. असंख्य गरजुंना मदत केली तसेच ते प्रभावी व आक्रमक वकृत्व आणि रोख ठोख भाषाशैली यामुळे विरोधकांना पळती भुई थोडी करत अशा या दोन थोर व्यक्तीची जयंती मुरुड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आली.
या प्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच हणुमंत (बापु) नागटिळक, महेश कणसे (ग्रा.पं.सदस्य) रवी आबा नाडे, सचिन घोडके,संतोष काळे, समाधान शितोळे,शिवलिंग चौधरी, खंडू कुंभार, दत्ता खडके, ग्रामपंचायत कर्मचारी वृन्द व नागरीक उपस्थित होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्रुदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांची जयंती साजरी
Recent Comments
on Hello world!
