- चाकूर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरनाळ केंद्र-अजनसोंडा (बु.) ता. चाकूर जि. लातूर येथे कलाविष्कार बालरंगी दुनियेतील सोनेरी कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलन सन २०२४-२५ शिरनाळ येथे पार पडला.प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व रिमीक्स आशा वेगवेगळ्या सर्व गाण्या गाण्यावर कला गुनांचा आविश्कार सादर करून प्रेक्षकांचे मने जिंकली व तसेच प्रोत्साहन पर बक्षीस पटावले.प्रेक्षकांनी टाळ्यांच्या स्वरूपात दाद देवुन त्यांचे मनोबल द्विगुणित केले.या कार्यक्रमाला उपस्थित शिरनाळ गावचे युवा सरपंच सुनील कांबळे शालेय समिती अध्यक्ष युवराज हाक्के ,किशोर भोसले ,तेजेराव पाटील , माधव काळवणे, व्यंकटराव पाटील , संग्राम गोणे , परमेश्वर गोलावार,संजय गोलावार, नागनाथ गोलावार, केशर करले मनोहर सुरवसे,नरहारी कांबळे विजय कांबळे आदी जन उपस्थित होते .व तसेच केंद्रातील शिक्षक सोमासे सर -मु.अ.प्रा. शा. मस्नेरवाडी शंकरे सर-मु अ प्रा शाळा ब्रम्हवाडी फुटाणे सर – साशि प्रा. शा. मस्नेरवाडी तानाजी वागलगावे, मनदुमले मॅडम,महालिंगे मॅडम सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.त्यांच ही ग्रामस्थांनी सन्मान केला व शुभेच्छा दिल्या.समारोप शिरनाळ गावचे युवा सरपंच सुनील कांबळे यांनी केले.

नृत्य करताना स्पर्धक
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जि.प.शाळा शिरनाळ येथे भव्य नृत्य स्पर्धा
Recent Comments
on Hello world!
