तरुणांनी रक्तदान करावे- विलासराव पाटील चाकुरकर यांचे आव्हान!
चाकुर सलीम तांबोळीः- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,श्रीमंतयोगी छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरा मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे चाकुर तालुका अध्यक्ष विलासराव पाटील चाकुरकर यांनी आपल्या जीवनातील ७० वे रक्तदान करुन छञपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.चाकुर येथील सोसायटी चौकात छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रक्तदान केले.थोर माहात्म्यांच्या जयंत्या व राष्ट्रीय सन समारंभ असो.किंवा रक्तपेढी मध्ये जाऊन दर तीन महिन्याला रक्तदान करीत असतात. विलासराव पाटील दर तीन महिन्याला एकदा रक्तदान करत असतात. तरुणांनी रक्तदान करावे असे आहवान त्यांनी केले.आपण केल्या रक्तदान कोणाच्या तरी कामाला येते.यातच आपले समाधान आहे.तरूणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे असे आव्हान यावेळी विलासराव पाटील यांनी केले.तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्यामुळे लहान वयात व्याधी शरीरात होत आहेत.आपल्या जीवनात ७० वेळा रक्तदान करुन तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.तरुणांनी समाज उपयोगी काम योगदान देणे ही आज काळाजी गरज आहे. विलासराव पाटी तालुका.स्वतः ते वर्षातुन 4 वेळा रक्तदान करतात.त्यामुळे या परिस्थितीमध्ये भविष्यात चाकुर तालुका व शहरासह जिल्ह्यात व राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वानी आपआपल्या परीने रक्तदान करुन कोरोना काळात गरजुंचे जीव वाचवण्यासाठी मदत करावी असे आव्हान विलास पाटील यांनी केले आहे.आत्ताच रक्ताचा प्रचंड पडण्याची शक्यता आहे.उन्हाळ्यात रक्तसाठ कमी असतो. रक्तदान करुन कोणाचे प्राण वाचवु शकतो का? याचा देखील विचार करण्याची गरज आहे.जो रक्ताचा तुटवडा भासत आहे.त्यासाठी आपण आपण रक्तदान करुन आपले सामाजिक योगदान देण्याची गरज आहे. आपल्या जवळच्या शासकीय किंवा खाजगी रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे.जेणे करुन कोरोना काळात आपल्या कडून समाजकार्य घडेल. रक्तदान करुन सर्व तरुणांनी राष्ट्रीय कार्यात आपला हातभार लावावा असे आहवान विलास पाटील यांनी केले आहे.शिवाजी महाराज यांची जयंती रक्तदान करुन साजरी करण्याचा त्यांना आनंद व्यक्त केला.यावेळी नगराध्यक्ष कपील माकणे,नगरसेवक भागवत फुले, शेख पप्पुभाई,,सलीमभाई तांबोळी,सजंय पाटील आदी जण उपस्थित होते.
