
रेणापूर प्रतिनिधी: बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले सद्गुरु सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त 15 फेब्रुवारी बंजारा समाजाने विविध उपक्रम राबवून त्यांची जयंती साजरी करावी,असे आवाहन संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना समिती सदस्य बाळू चव्हाण यांनी केले आहे,बंजारा समाजाचे श्रद्धास्थान महापुरुष सद्गुरु सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 ला बंजारा कुटुंबामध्ये गोलार डोडीतांडा ता गुत्ती जि अनंतपूर आंध्रप्रदेश येथे झाला संत सेवालाल महाराज यांची जयंती सर्वांनी मोठया उत्साहात उपक्रम राबवावेत असे आवाहन संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना समिती सदस्य बाळू चव्हाण यांनी केले आहे,बंजारा समाजातील नव्हे तर इतर सर्व समाजाना एकत्र करण्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग देणारे,अविष्यभर लग्न न करता गोर गरीबाच्या सेवेसाठी लढणारे,अनेक भाषाचे ज्ञान संपादन करणारे तीन हजार 755 गाईगुरांसोबत जीवन व्यथीत करणारे,आई धर्मळी याडी आणि वडिल भीमानायक यांचा आदर्श घेऊन भारत भर प्रवास करणारे इंग्रजाना कर न देता इंग्रजाच्या विरोधात बंड पुकारणारे “हमारा तांडा हमारा राज” अशा घोषणा देणारे, महान योद्धा क्रांतिकारी, समाजसुधारक,अर्थ शास्त्रज्ञ आयुर्वेदिक ज्ञान असणारे सद्गुरू सेवालाल महाराज यांची 15 फेब्रुवारी ला जयंती असल्यामुळे सर्व तांडा-वाडी वस्त्यामध्ये तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालाय मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात यावी असे आवाहन संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना समिती सदस्य बाळू चव्हाण यांनी केले आहे.
सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्याचे आवाहन
Recent Comments
on Hello world!
