बाबूराव बोरोळे:विभागीय उपसंपादक लातूर
अहमदपूर तालुक्यातील उजना गावचे विलास पंढरी परतवाघ अंदाजे वय वर्षे ४५ यांचे आज शेतात विजेचा शॉक लागून अपघाती निधन झाल्याची दुर्दैवा घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी विलास पंढरी परतवाघ हे साधारणतः 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी आले असता गट नंबर 272 मधील शेताचे शेजारी अनिल स्वामी राहणार वजना यांच्या शेतातून पाईप जोडून पाणी घ्यायचे असल्याने विलास पंढरी परतवाघ हे अनिल स्वामी यांच्या शेतात जात असताना शेताच्या चहुबाजूने रानडुकराच्या बचावासाठी विजेची तार बांधलेली होती हे त्यास दिसले नसावे आणि त्या तारेमधून विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्या तारेस चिटकून विलास परतवाघ यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. सदरील घटनेची माहिती किनगाव पोलिसांना मिळताच किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे व त्यांचे पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून मयतास सविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी येथे पाठवून दिले असून पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
