बाबुराव बोरोळे विभागीय उपसंपादक लातूर 
लातूर : उदगीर तालुक्यातील लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर स्मारकाचे भुमिपुजन आणि सेवानिवृत्त अंमलदार अंगद मोगले यांचा पत्नीसह सत्कार समारंभ दि.२१ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आमदार संजयजी बनसोडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व सेवानिवृत्त हवालदार अंगद मोमले याचा सत्कार करण्यात आला आहे.पहिल्यादा लोहारा नगरित महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे चौका चौकात आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सरपंच सौ महादेवी कांबळे हया होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी भोसले.सुनिल केंद्रे उपसरपंच शंकरराव भातमोडे.शेषेराव हेळगे.ग्रामविकास अधिकारी गजानन भोसले.दिलीपराव पाटील. त्र्यंबकराव बिरादार.शामभाऊ सोनटक्के.सेवानिवृत्त शिक्षक पंढरी बिरादार. लघु उद्योग महिला सुरेखा पांचाळ.बचत गट वर्षा गुराळे.नंदा होळकर.बॅक सखी सरिता करडखेले.हरिभक्त कृष्णा महाराज, इंजिनिअर कमलाकर बिरादार,एस.बीआय.बॅक मॅनिजेर कांदे,सुभाष कांबळे,प्रकाश हैबतपुरे,उत्तम भुरे,विशाल बिरादार,नरसिंग पाटील.आदी उपस्थित होते.वरिल पाहुण्यांचा व सेवानिवृत्त हवालदार अंगद मोगले यांचा आमदार संजयजी बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सुभेदार मेजर संजीव अजने,शामभाऊ सोनटक्के,सेवानिवृत्त हवालदार अंगद मोगले,आमदार संजयजी बनसोडे,मोहन पाटील आदिनी मनोगत व्यक्त केले.
