चाकूर प्रतिनिधी 
भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर येथे आज शैक्षणिक शैक्षणिक वर्षाची सुरुवात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वृक्षारोपण व पुस्तक वाटप सोहळ्याने करण्यात आली.यासाठी लोकायत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सीमाताई अभय देशमुख,सचिव एडवोकेट पीडी कदम व वरिष्ठ प्राध्यापक दत्तात्रेय ज्योतीराम पवार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख नवले आर ए यांनी केले. यावेळी सर्वप्रथम लोकायत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सीमाताई देशमुख व सचिव एडवोकेट पी डी कदम यांच्या हस्ते सरस्वती व विद्येची सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सत्कार सोहळा पार पडला.नंतर अध्यक्ष व सचिवांच्या हस्ते नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. त्यांच्या पायाचे ठसे घेऊन शाळेत संग्रहित ठेवण्यात आले.तसेच त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण विद्यालयात पार पाडले व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशा प्रकारे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात करण्यात आली.
