Saturday, December 6, 2025
spot_imgspot_img
Homeमहत्वाचेछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन - झरी बु...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन – झरी बु येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

 नवनाथ शा डिगोळे चाकूर तालुका प्रतिनिधी

मौजे झरी बु (ता. चाकूर) येथे दिनांक 10 जून 2025 रोजी महसूल विभाग तहसील कार्यालय चाकूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत एक दिवसीय समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर श्री हनुमान मंदिर, झरी बु येथे पार पडले.या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक माननीय नायब तहसीलदार शैलेश निकम साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सातबाराला आधार कार्ड जोडून ॲग्री स्टॅक योजनेत नोंदणी करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जनजागृती केली. यामध्ये जिवंत सातबारा मोहीम, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, संजय गांधी निराधार योजना, खरीप अनुदान ई-केवायसी यासारख्या योजनांचा समावेश होता.शिबिरामध्ये खालील प्रमाणपत्रांचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले:जिवंत सातबारा मंजूर फेरफारनिवडणूक ओळखपत्र जातींचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र तसेच गावातील आधार अपडेट, स्वस्त धान्य दुकानांमार्फत केवायसी, जनधन योजनेच्या खात्यांची उघडणी, आणि लाडक्या बहिणीचे पैसे काढून देणे अशा उपयुक्त सेवा देखील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.या शिबिरास तहसील चाकूर येथील संजय कासरळीकर, मंडळ अधिकारी नागनाथ कवठे, ग्राम महसूल अधिकारी मुकुंद सुडके, ग्रामसेवक सुरेश पाईकराव, तसेच सरपंच सौ. सुरेखा दयानंद सुरवसे, सोसायटी चेअरमन आबाजी सुरवसे आणि गावातील मान्यवर उपस्थित होते. याशिवाय महसूल विभागातील अनेक कर्मचारी व महा-ई-सेवा केंद्र चालक दीपक मोहिते, ऑपरेटर बाळकृष्ण मूर्के, अर्चना स्वामी, कैलास राजुरे आदींनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या शिबिराचा लाभ घेतला. महसूल विभागाच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

मुख्य संपादक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments