
चाकूर प्रतिनिधी : २६ जानेवारी २०२५ भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजारोहण लोकायत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सीमाताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच वेंकटेश उत्सवा अंतर्गत विद्यालयात विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला व माता पालकांसाठी आई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच सर्व धर्म समभाव दर्शवणारी मुक नाटिका सादर केली.टिपऱ्या लेझीम व समूहगीत सादर करण्यात आले.त्यानंतर सर्व माता भगिनींना तिळगुळ व संक्रांति निमित्य वाण म्हणून शैक्षणिक साहित्य पेन देण्यात आली.तसेच यावेळी ध्वजारोहणानंतर सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक कवायतही घेण्यात आली.अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख नलमले आर.ए यांनी केले.तसेच सांस्कृतिक विभागामार्फत दिंडके ए.एन बने एस.एस शेख एस.जी माने ए.टी सांगवीकर व्ही.एल व इतरही सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या कार्यक्रम करण्यासाठी परिश्रम घेतले.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सर्वांनी यशस्वीपणे पार पाडल्यामुळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पवार एस.डी यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.
