•शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन•
अहमदपुर : तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने एस टी दर भाडेवाढ रद्द करावी यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक एस टी बसस्टँड
समोर चक्का जाम आंदोलन करुन महायुती सरकारचा निषेध केला.महाराष्ट्र शासनाने विनाकारण एस टी दर भाडे १५% वाढ केली आहे, गोर गरीबांची लाल परी म्हणून ओळखली जाणारी बस महागडी झाली सामान्य जनतेच्या जीवनावर हा भार पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि परिवहन महामंडळाने त्वरीत केलेली दर वाढ रद्द करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन येथील आगार प्रमुख अमर पाटील यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी व प्रवाशाच्या हस्ते देण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता हेंगणे,उपतालुका प्रमुख तिरुपती पाटील,अनिकेत फुलारी,गणेश माने,लहू बारवाड,तिरुपती पाटील,संतोष,आदटराव,उपशहरप्रमुख,शिवाभारती,शिवकुमार बेद्रे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
