लातूर:
लातूर दि.२९ आज सध्याच्या घाईघाईच्या जीवनामध्ये माणसांना व्यक्तींना आपल्या कामाशिवाय वेळ नसल्यामुळे शरीराकडे व आरोग्य यांच्याकडे लक्ष देण्याचे टाळाटाळ होत आहे.त्यामुळे शरीराला न काम करण्याचे शारीरिक त्रास होण्याचे आजार हे आपण सतत पाहत असतो बघत असतो. परंतु याच अनुषंगाने सर्व गोष्टीचा विचार करून सर्वसामान्य नागरिकांना एक दिवशी आरोग्य व अध्यात्मिक शिबिराचा मोफत लाभ मिळावा, यासाठी प्रशांत कुलकर्णी,राजाराम केलूरकर, आबासाहेब रेड्डी,भागवत कारभारी,संजीव स्वामी, यदुनाथ महाराज,पंढरी शेळके,कोरे साहेब या सर्व लातूरच्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून या शिबिराचे आयोजन केले होते.यामध्ये आदरणीय डॉ गोपाल शास्त्री यांनी २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते ०५ वाजेपर्यंत आपल्या जीवनशैलीतील कशाप्रकारे बदल करायचा आहे,त्याबद्दल मार्गदर्शन केले आहे. दिन मे कच्च्या रात मे पक्का आणि सजनल रिजनल ओरिजनल अशा प्रकारचा आदर्श भोजन प्रणाली घेतल्यामुळे आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या बिमारीवर रोगप्रतिकारशक्ती मात करू शकते याबाबत चांगले मार्गदर्शन केले गेले.आणि शिबिरात सोलापूर परभणी औरंगाबाद या ठिकाणचे साधक आले होते.लातूर मधील एकूण २०० लोकांनी या आरोग्य शिबिराचा व अध्यात्मिक शिबिराचा लाभ घेतला.परंतु हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला त्यांचे मात्र लातूर जिल्ह्यामध्ये कौतुक होताना दिसत आहे.
लातूर येथे एक दिवशी आरोग्य व आध्यात्मिक शिबिर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने साजरा
Recent Comments
on Hello world!
