
प्रतिनिधी : नवनाथ (रवीराज) डिगोळे
द्रौपदी-सुभद्रा समोर रुक्मिणीच्या येती
हळदी-कुंकूवाचा मान सारीयाशी देती !!
श्री स्वामी समर्थ केंद्र चाकुर केंद्रातील सर्व महिला-भगिनी व सेवेकरी यांनी मकर संक्रांत निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रसंगी महिला-भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या सेवेत सहभाग नोंदवीला होता.तसेच यावेळी ६:३०(सायंकाळची) नैवेद्य आरती,जप,व प्रवचन झाले.प्रसंगी असंख्य सेवाकरी उपस्थित राहुन हा कार्यक्रम चाकूर च्या श्री स्वामी समर्थ केंद्रात आज संपन्न झाला.मामडगे भाऊच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
