
मुरुड प्रतिनिधी:३१ आज मुरुड येथील जनता विद्या मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य नामदेव मेश्राम यांच्या सेवेचा आज शेवटचा दिवस जवळपास ३३ वर्षाची प्रदीर्घ सेवा करून आज ३१ जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत.त्याबद्दल प्रशालेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने त्यांचा प्रशालेचे उपमुख्याध्यापक डी. व्ही जाधव यांनी सत्कार केला.तसेच प्रशालेतील सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने देखील विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी सरांचा सत्कार केला.या प्रसंगी जेष्ठ पर्यवेक्षक जी.पी पिसाळ अरुण पाटील तनुजा कोष्टी यांनीदेखील सेवापूर्ती निमित्त सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ पर्यवेक्षक जी.पी पिसाळ यांनी सरांच्या ३३ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला.सत्काराला उत्तर देताना विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक असलेल्या नामदेव मेश्राम यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामांचा आढावा घेऊन पुढील काळासाठी प्रशालेतील सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण देशपांडे यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
