चाकूर प्रतिनिधी : 30 जानेवारी भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर येथील इयत्ता दहावीत अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी महाविद्यालय चापोली येथील सेवानिवृत्त प्राध्यापक श्रीहरी वेदपाठक व पत्रकार थोर साहित्यिक लोकायत शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय भाई किशनरावजी देशमुख यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांना आमंत्रित केलेले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले.यावेळी सराव परीक्षेतील गुणाानुक्रमे प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी चिंते प्रीती हिला स्वयंशासन दिनाचा मुख्याध्यापक घोषित करण्यात आलेले होते.तसेच दुसऱ्या नंबर वर आलेला सोनटक्के सदाशिव याला पर्यवेक्षकाची भूमिका देण्यात आलेली होती व गुणानुक्रमे येणाऱ्या वीस विद्यार्थ्यांची निवड शिक्षकांच्या भूमिकेसाठी केलेली होती.अशा प्रकारे एकूण 22 विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रित्या शालेय कामकाज सांभाळले.यावेळी शाळेच्या पहिल्या घंटी पासूनच शिस्त शांतता राखली व तसेच दिवसाची सुरुवातच त्यांनी उत्कृष्ट अशा परिपाठापासून व शालेय सूचना पासून केली.त्यामुळे दिवसभर शालेय कामकाज अतिशय शिस्तीत पार पडले व त्यानंतर 2024 25 च्या दहावी वर्गातील बॅचला निरोप देण्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन केलेले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववी ब वर्गातील विद्यार्थिनी गायत्री पवार हिने केले.यावेळी सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर आमंत्रित केलेल्या पाहुण्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला.नंतर दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले,यात कु.साठे प्रगती कुमारी आटोळकर अवंतिका,कु लंकाले मीनाक्षी कु.अपूर्वा थोरात तसेच चाफळे पूनम या विद्यार्थिनीने भावपूर्ण असे सुंदर गीत गायन केले.यावेळी प्राध्यापक श्रीहरी वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशा शिवाय पर्याय नाही जीवनात बारावीपर्यंत कष्ट घेतले तर इतर जीवन आपल्याला सुखमय जगता येईल असा संदेश आपल्या भाषणातून दिला.तसेच डॉक्टर सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना नवीन ध्येय समोर ठेवून सतत लढत राहण्याचे आव्हान केले.जीवनात ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कल्पकता शौर्य साहस व नियोजन या गोष्टींची आवश्यकता आहे.तसेच समाजात वावरताना नकारात्मक विचारांपासून स्वतःचे संरक्षण करावे असा मोलाचा संदेश डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख इजारे एन.एम यांनी केले व शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लामतुरे मोहिनी या विद्यार्थिनींनी केले अशा प्रकारे अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात 24-25 च्या बॅचचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ घेण्यात आला. नंतर सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले व निरोप देण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयातील सर्व कर्मचारी नलमले आ.रे ढोकाडे डी.पी, सांगवीकर व्ही.एल,माने एटी, शेंडगे एस.एन, चाटे एस.एन धोंडगे डी.एम, डोंगरे के.एम व शिक्षकेतर कर्मचारी देशमुख डी.बी, कांबळे एम.ए तसेच सेवक शेख एस.सी यांनीही सहकार्य केले अशा प्रकारे आनंदी वातावरणात कार्यक्रम सादर करण्यात आला.
भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा
Recent Comments
on Hello world!
