शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांचे आभार – बापुराव (पवन) देऊळकर

अहमदपुर प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या सहकार्याने अंधोरी येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळाले. अशी भावना व्यक्त करत ग्राम.प.सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापुराव (पवन) देऊळकर यांनी सांगितले की,तालुक्यातील अंधोरी येथील जिल्हा परिषद शाळा पहिले ते दहावी पर्यंत आहे.अनेक वर्षे झाले फक्त सहा शिक्षक शिकवण्याचे काम पहात होते. नावा रुपाला आलेली शाळा ज्या शाळेने अनेक खेळाडू निर्माण केले, जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय स्पर्धा जिंकून अनेक खेळाडूंनी स्पर्धा गाजवल्या अशी शाळा बंद पडते की काय असे वाटत होते. मागील अनेक महिन्यांपासून वारंवार शासकीय स्तरावर निवेदने देऊन शिक्षकांची मागणी करण्यात येत होती, त्याला यश मिळत नव्हते. शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली असता त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर – घुगे यांची भेट घेऊन सर्व विषयावर सविस्तर चर्चा केली. लागलीच जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर -घुगे यांनी शिक्षकांची मागणी लक्षात घेऊन शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे यांना शिक्षक देण्याचे आदेश दिले. शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे मॅडम यांनी दि. 31/01/2025 समायोजन आहे तरी अंधोरी जिल्हा परिषद शाळेतील माध्यमिकच्या एकही जागा रिकामी राहणार नाही आसे त्यानी सागीतले आणि 31 तारखेला एकुण तीन शिक्षक देऊन सहकार्य केले. अंधोरी येथील ग्रामस्थ,विद्यार्थी, पालक शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर -घुगे शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे यांचे आभार व्यक्त करत आहेत असे ग्राम.प.सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापुराव (पवन) देऊळकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
