मुरुड प्रतिनिधी : आज दि. ०२/०२/२०२५ रोजी मौ. मुरुड ता. जि. लातूर येथे ग्रामपंचायत कार्यालयास सहकारमंत्री मा. ना. श्री. बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी त्यांचा मुरुड नगरीच्या मा. सरपंच श्रीमती अमृताताई अमर नाडे व उपसरपंच श्री. हनुमंत बापु नागटीळक यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी श्री. दुधाटे बी. बी. माजी उपसरपंच आकाश कणसे व ग्रा.पं. सदस्य महेश कणसे, अनंत कणसे, सुर्यकांत गाडे, सुरज सुर्यवंशी, मेघराज अंधारे, लताबाई भोसले, अंजु शिंदे, तसेच रवी आबा नाडे, अशोक चव्हाण, संतोष काळे, अविनाश सवाई, वैजीनाथ हराळे, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी सहकारमंत्री पाटील साहेब यांना मुरुड शहरासाठी प्रशासकीय कार्यालय व विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन देणे बाबत ग्रामपंचायत मुरुडच्या वतीने निवेदन देण्यात आले. व युवा भिम सेना शाखा मुरुड च्या वतीने मौ. मुरुड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन देणे बाबत निवेदन देण्यात आले, सदरील कार्यक्रमाचे सुत्र संचालन नागराज बचाटे यांनी केले. या प्रसंगी गावातील सर्व पत्रकार वर्ग व ग्रामपंचायत कर्मचारी वृन्द उपस्थित होते.
मुरुड ग्रामपंचायत कार्यालयास सहकारमंत्री बाबासाहेबजी पाटील यांची सदिच्छा भेट
Recent Comments
on Hello world!
