• ५ ते १० कोटी गटातील नागरी पतसंस्थेत मिळवळे अव्वल स्थान

चाकूर प्रतिनिधी: येथील चाकूर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीला बँकोच्या प्रथम पुरस्कार मिळाला असून गुरुवारी लोणावळ्यात एका कार्यक्रमात चेअरमन युनूस मासूलदार यांना माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला अशोक नाईक, अविनाश गुंडाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सहकार क्षेत्रात चाकूर अर्बनचे कार्य अत्यंत प्रशंसनीय असून हा पुरस्कार संस्थेच्या गुणवत्ता आणि कार्यक्षमतेचा गौरव ठरला आहे. चाकूर अर्बनने ५ ते १० कोटी गट श्रेणीत ना-गरी पतसंस्थेत अळ्ल स्थान मिळवून बँकोचा मानाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. चेअरमन युनूस मासुलदार, शाखा अधिकारी अविनाश सुरनर, गणेश हंकारले, प्रशांत महाजन,आत्माराम डाके, रज्जाक मासूलदार, अशोक शेळके, उमाकांत फुलारी, नाना डाके, दत्तात्रय सूर्यवंशी यांनी सदरील पुरस्कार स्वीकारला. चाकूर अर्बनने उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि ग्राहकांना दर्जेदार सेवा दिल्यामुळे हा पुरस्कार प्राप्त केला आहे. संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे चेअरमन युनूस मासूलदार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला विविध सहकारी बँकिंग क्षेत्रातील तशाची उपस्थिती होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल चाकूर अर्बनचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
