नवनाथ (रवीराज) डिगोळे: चाकूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या.चाकूरच्या कार्यालय समोर शेतकऱ्यांची रांग लागली होती. शेतकऱ्यांच्या सोयाबीन ने भरलेल्या वाहानांची सुद्धा मोठया प्रमाणात रांग होती.या स्थितीकडे कोणी लक्ष देनार का असा सवाल याठिकाणी उपस्थित केला जातोय.शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जातोय.तसेच भरलेली गाडी वजन होण्यासाठी कमीत-कमी 3-4 दिवस लागत असून याचा अतिरिक्त गाडी भाड्याचा भार हा शेतकऱ्यांना भरावा लागत आहे.शेतकरी दिवसरात्र मेहनत करून ऊन ,वारा व संध्याकाळ ची कडाक्याची थंडी आशा परिस्थितीतून मालाची देखभाल करतो.तरीही माल विकेपर्यंत शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच हामालासोबतच ईतर रक्कम शेतकर्याच्याच बोकांडी बसत आहे.बार्दाना म्हनजेचे पोत्याची कमतरता असल्याने त्याचा ही भार शेतकर्यालाच सारावा लागत आहे.आज शेतकरी यातना भोगत आसुन या कडे कोणाचेही लक्ष नाही,असे म्हणावे लागेल.
चाकूरात सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगाच रांगा
Recent Comments
on Hello world!
