मुरुड प्रतिनिधी : मुरुड येथील जनता विद्या मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री नामदेव मेश्राम हे नियत वयोमानानुसार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त झाले.यानिमित्त रुरल एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत त्यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुरल एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री अमर मोरे यांची उपस्थिती होती तर संस्थेचे सहसचिव श्री विवेक पांगळ,संचालिका श्रीमती सुवर्णा पांगळ,श्री नितीन माने यांच्यासह प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर मुंबरे, श्री माणिकराव रोहिले यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली.याप्रसंगी रुरल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने श्री व सौ मेश्राम यांचा यथोजीत सत्कार करण्यात आला.तसेच जनता विद्या मंदिर परिवाराच्या वतीने प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री डी.व्ही. जाधव व सर्व पर्यवेक्षक वृंदांनी त्यांचा सत्कार केला.याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री मेश्राम यांनी त्यांच्या 33 वर्षाच्या सेवा काळामधील विविध अनुभवांचे कथन केले, तसेच प्रशालेचा नावलौकिक वाढविण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना व प्रशासनाला शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय समारोपात श्री अमर मोरे यांनी शाळेच्या प्रगतीमध्ये सरांचे योगदान अतिशय अमूल्य असल्याचे नमूद करून, भविष्यातील शाळेच्या वाटचाली संदर्भात सरांचे नेहमी मार्गदर्शन घेत राहू..असा आशावाद प्रकट केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री रामकृष्ण देशपांडे यांनी केले तर आभार ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री अरुण पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.याप्रसंगी मोठ्या संख्येने अनेक माजी शिक्षक,माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
जनता विद्या मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नामदेव मेश्राम यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
Recent Comments
on Hello world!
