जखमी झालेल्या तरूणांस दिला धीर!
चाकुर सलीम तांबोळी: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे चाकुर तालुका अध्यक्ष विलासराव पाटील चाकुरकर चाकुरहुन आपल्या वाहनामध्ये लातुरकडे जात असताना.लातुर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एक तरूण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यामध्ये तळमळत पडला होता.जखमी तरूणांस कोणीच मदत करीत नव्हते बघ्याची गर्दी जमली होती.जमलेला लोक अपघातातील तरूणाचा व्हिडीओ बनवत होते.चाकुर शहरातील माझी माय मंगल कार्यालयासमोर संध्याकाळी अंदाजे ४-०० वाजता दोन मोटार सायकचे समोरासमोर अपघात होऊन चाकुर येथील तरूण काशीनाथ कवठाळे हा अपघात झाल्यामुळे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता.रस्त्यातून जाताना एक तरुण रोडवर पडून तळमळतांना दिसला. संबंधित घटनास्थळी धाव घेत विलासराव पाटील चाकुरकर वेळेवर त्या तरुणावर प्राथमिक उपचार करण्यासाठी स्वतःच्या गाडीमध्ये बसवून चाकुर येथील ग्रामीण रूग्णालयात घेऊन आले.त्यांनी गाडीत जखमी तरूणांस गाडीमध्ये बसवून त्याला धीर दिला व तुला जास्त मार लागले नाही तु घाबरून जाऊ नकोस म्हणून त्या तरूणास त्यांनी ग्रामीण रूग्णालयात आणले.दोन मोटर सायकलचा समोरासमोर अपघात होऊन तरूण काशीनाथ कवठाळे जखमी अवस्थेत पडला होता.चाकुर येथील डॉक्टरांनी अपघातग्रस्त तरूणांनावर प्राथमिक उपचार केले.प्राथमिक उपचार चाकुर येथील ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांनी केल्यानंतर त्या तरूणांस पुढील उपचारासाठी लातुर येथील शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले. तरुणासोबतच ग्रामीण रूग्णालयात बसून होते.विलासराव पाटील यांच्यामुळे शहरातील एका तरूणांस जीवनदान मिळाल्यामुळे चाकुर शहरात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.लातुर येथील शासकीय रूग्णालयात कशीनाथ कवठाळे उपचार घेत आहेत.त्यांची प्रकृती आता ठणठणीत आहे.
रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर सरकार कडून किंवा पोलीस विभागाकडून मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणाताच ञास होत नाही.आपण मदत केल्यामुळे कोणांचे तरी जीव वाचते.चाकुर जवळील अपघातात तरूणांचा रक्तश्रव जास्त होत होता.त्या तरूणांनाला ताबडतोब माझ्या गाडीत बसवून उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात आणलो.डॉक्टरांनी सांगितले तुम्ही याला वेळेवर आणल्यामुळे त्याचा जीव वाचला.कारण रक्त खुप गेले होते.अपघात ग्रस्तांस मदत करण्यासाठी सर्वांच पुढाकार द्यावे फक्त व्हिडीओ न जमाव जमून गर्दी करू नये मी सामाजिक बांधिलकी म्हणून अपघात झालेल्या तरूणांची मदत केली.आपणही कोठे जर आपल्या समोर अपघात झाले तर मदत करावी.
