बाबुराव बोरोळे- विभागीय उपसंपादक

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नेहरु युवा केंद्र स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य रामेश्वर धनराज चावरे डिगोळकर यांच्या तर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यांत सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असणारा त्यांत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मनकर्णा हजारे, सीमा जाधव मॅडम, रेखा शिवपुजे मॅडम, अनुराधा वकील मॅडम, शृंगारे मॅडम, वाघमारे मॅडम होत्या.अंगणवाडी मधील सेविका त्यांत करुणा बिरादार, प्रवीण मुंजेवार, सरोजा वाडकर, अलीमुन मुंजेवार, विजश्री कांबळे, होत्या.राजकीय त्यांत ग्रामपंचायत मधील सरपंच कविता दासरे, सदस्या कलावती स्वामी, सुनिता बिरादार, वैशाली सुर्यवंशी होत्या.प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला निर्मलाताई सुरवसे , लक्ष्मी कांबळे, रेखा कांबळे यांचा समावेश होत.सामाजिक कार्य करणाऱ्या महिला त्यांत ज्योती वाडकर, धार्मिक शोभा बावगे इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक, पेन देऊन सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले शिरुर अनंतपाळ तालुक्याचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठलराव दराडे साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमोल निडवदे, नेहरु युवा केंद्र स्थानिक सल्लागार समिती सदस्य रामेश्वर चावरे, माजी विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील, बीट जमादार बिराजदार, सरपंच कविता दासरे, महेश पाटील, धनराज चावरे, राम बिरादार,युवा मोर्चाचे शरद पांचाळ, महेश भंडारकोटे, प्रसाद नाईकवाडे, नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी साक्षी समैया मॅडम, समन्वयक शुभम पाटील, तुळशीदास बिरादार, प्रल्हाद बिरादार, रमाकांत बिरादार, महादेव कोटे,एकनाथ ककुर्ले, प्रमोद पाटील,नागनाथ कोटे, जनक बिरादार,शैलेश बेवनाळे, अप्पासाहेब बिरादार, शिवहार कोटे, शुभम पाटील, खंडेराव बोयणे, राहुल कांबळे , सचिन वडजे, प्रताप बिरादार, संगम कोटे, उद्धव जाजुर्णे, व नागरिक उपस्थित होते.
