Thursday, January 22, 2026
spot_imgspot_img
Homeमहत्वाचेचाकूरात रमजान ईद उत्साहाने साजरी 

चाकूरात रमजान ईद उत्साहाने साजरी 

• देशावरील आर्थिक संकट लवकर दुर व देशात अमन शांती राहावी म्हणून सामुहीक दुवा [प्रार्थना ]

चाकुर सलीम तांबोळी :भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्य गोविंदाने येथे राहतात.विविधेतच एकता आपल्या देशाचे वैशिष्ट्ये आहे.काही राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब भाई-भाई असा अनोखा संदेश ईद निमित्त आज देण्यात आला. सकाळी १०ः३० वाजता इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवानी पविञ रमजान ईदची नमाज पठण केली.रमजान महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहता असतात.यावर्षी मुस्लिम बांधवांनी नमाज,इबादत,तारावेची नमाज मज्जिद मध्ये पठण केली. आणि विशेष बाब म्हणजे सर्वांत मोठ्या रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानावर अदा करण्यात आली.आज आपले देश आर्थिक मंदीत सापडले आहे.यातुन लवकर मार्गा काढावे म्हणून ईश्वराकडे विशेष दुवा करण्यात आली.इदगाह मैदानावर लहान मुले,तरूण,वयोवृध्द,सर्वांनी नवीन कपडे परिधान करुन आले होते.मैदानावर बसण्यासाठी भव्य मंडप टाकण्यात आले होते.वजु करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लीम बांधवांनी हळुहळु रमजान ईदची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. मार्च महिन्याच्या कडक उन्हात यंदा रमजान महिना होता.जवळपास १२ ते १३ तास अन्न पाण्याविना रोजा [उपवास] होता.शहरांचे तपमान ३०ते ३५ अंशांपेक्षा गेले नाही.अत्यंत आनंदाने मुस्लीम बांधवानी यंदा रोजे धरले.यंदा २९ रमजानचे उपवास झाले. ३० मार्च रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाले ३१ मार्च सोमवारी रोजी रमजान ईद साजरी करण्यात आली. रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी मोठ्या प्रमाणात कोरोना मुक्तीसाठी दुवा केली.मुस्लीम बांधवांना ईदचे वेध लागले आहेत.अनेकजणांनी ईद उत्साहाने साजरी केली.रमजान ईद उत्साहाने साजरी करण्यात आली.ईश्वराकडे सर्वांनी नमाजनंतर प्रार्थना केली.हे आजच्य प्रत्येक क्षणाला घाबरत आहेत.मन सुन्न सुन्न होत आहे,.अल्लाह [ईश्वर] तु दयावान आहेस दयाळु आहे.मानवाला तुच जिवनदान देणार आहेस! आम्ही चुकलो क्षमा कर!हिच प्रार्थना करतोत!तु मातीपासुन शरीर निर्माण करणारा आहे.आणि तुच मातीत हे नश्वर शरीर नष्ट करणारा आहे.! गरिबांच्या कष्टकर्याच्या आणि श्रीमंताचा दाता तुच आहे.आपापसातील प्रेम चिरकाल टिकु दे,संपूर्ण जगाला एक संघ ठेव,पैगंबर [स.स.] यांनी सांगितलेल्या गोष्टीचा अंगीकार करणारा बनावे.माणसाला माणुस म्हणून वागवणारा सृष्टीतील प्रत्येक जीविताशी प्रेम करा.,प्रत्येकावरील आर्थिक संकट दुर कर, अल्लाह जगातील प्रत्येक माणसाला सुखी कर मानवाला क्षमा कर.. अशी प्रार्थना मानवजातीसाठी,त्यांच्या आरोग्यसाठी व देशातुन कोरोना लवकरच हद्दपार करावा म्हणून विशेष दुवा मागण्यात आली.यावेळी ईदगाह मैदानावर चाकुर नगरपंचायत नगराध्यक्ष कपील माकणे, बालाजी पाटील चाकुरकर,बालाजी सुर्यवंशी,भागवत फुले,युवराज पाटील, सुदर्शन स्वामी,अनिल वाडकर, सागर होलदांडगे,राम कसबे,शिवशंकर हाळे,संदीप शेटे, सजंय पाटील,नरसिंग गोलावार,चिंतामणी सिरसाठे,राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या.साहाय्यक पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानावर पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर ,पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी, चाकुर बिट अमलंदार बोळगे व श्रीमंत आरदवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त होता.

चाकुर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कपील माकणे यांच्या वतीने ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी आलेल्या मुस्लीम बांधवाना त्यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या व महिनाभर उपवास धरणाऱ्यांना रोजेदारांना शुभेच्छा दिल्या .मुस्लिम बांधवांनीही नगराध्यक्ष कपील माकणे यांनीही ईदच्या शुभेच्छाचा स्विकार केला.

मुख्य संपादक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments