चाकूर प्रतिनिधी :
भाई किशनराव नराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर येथील शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये इयत्ता दहावी बोर्ड शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण 113 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेले होते त्यापैकी 109 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून केवळ चार विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेली आहेत विद्यालयाचा निकाल 96 .4 % लागलेला आहे विद्यालयातून प्रथम येण्याचा मान कुमारी चिंते प्रीती मारुती (सेमी माध्यम) या विद्यार्थिनीने मिळवला आहे तिला 95.2% गुण मिळालेले असून ती सेमी माध्यमात प्रथम क्रमांकावर आलेली आहे तसेच सोनटक्के सदाशिव या विद्यार्थ्यांना 94.2% गुण घेऊन तो सेमी माध्यमात द्वितीय आलेला आहे मराठी माध्यमात प्रथम येण्याचा मान कुमारी लंकाले मीनाक्षी संग्राम 86.2% व सोनवणे ऋतुजा निळकंठ या विद्यार्थिनीने 79.8% घेऊन ती मराठी माध्यमातून आलेली आहे अशा प्रकारे इयत्ता दहावी वर्गाचा शैक्षणिक वर्षाचा निकाल यावर्षीही चांगल्या प्रकारे लागल्यामुळे भाई किशनराव देशमुख विद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती सीमाताई देशमुख सचिव एडवोकेट पी डी कदम साहेब सहसचिव माजी मुख्याध्यापक बाबासाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व अध्यापकाचे खूप खूप अभिनंदन केले.
