चाकूर प्रतिनिधी :
भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर येथे 2004 -05 या कालावधीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वीस वर्षानंतर अकरा मे वार रविवार रोजी झाली स्नेहभेट विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊनही सुरुवातीला ज्या शाळेत शिकले ती शाळा कायमस्वरूपी त्यांच्या स्मरणात राहते. त्यामुळे उच्च पदावर गेल्यानंतर लहानपणीचे दिवस बालपणात केल्या गेलेल्या खोड्या या सर्व त्यांना काही ठराविक कालावधीनंतर आठवतात त्यामुळे लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 2004 ते 05 या कालावधीमध्ये अध्ययन करणारे विद्यार्थी यांची 11 मे रोजी परत भेट झाली हा माजी विद्यार्थी मेळावा घडवून आणण्यासाठी भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी एडवोकेट प्रकाश सोमवंशी यांनी प्रयत्न करून त्यांच्या बॅचमधील जवळपास 70 विद्यार्थ्यांची भेट घडवून आली या दिवशी या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी गुजरात , यवतमाळ , वाशिम , परभणी , लातूर येथून दूर दुरून विद्यार्थी रात्रभर प्रवास करून विद्यालयात उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सदरील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कालावधीत असणारे सर्व अध्यापक आमंत्रित केलेले होते यात भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री बाबासाहेब देशमुख , इतिहास विषय अध्यापक श्री माने ए व्ही , इंग्रजी विषय अध्यापिका श्रीमती कोयले एस ,श्रीमती माने ,श्रीमती पवार एस डी ,श्री धोंडगे डी एम , श्री एडले श्री केसराळीकर लिपिक श्री कांबळे एम ए , शिक्षकेतर कर्मचारी सेवक श्री शेख एस सी , या सर्वांना आमंत्रित केलेले होते या दिवशी दिवसभर वेगवेगळे उपक्रम घेऊन अक्षरशः वीस वर्षाची शाळा विद्यार्थ्यांनी परत एकदा भरवली पहिली घंटी , प्रार्थना , परिपाठ , हजेरी ,वर्ग अध्यापक या सर्व गोष्टी क्रमानुसार त्या दिवशी विद्यालयात घेण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपल मनोगत व्यक्त केल शाळेचे पूर्वीचे नाव लोकमान्य होत त्या नावातच वेगळी जादू होती त्यामुळे खरंच आम्हाला अभिमान होता पण शाळेचे नाव जरी बदलले असले तरी या शाळेने आजपर्यंत हजारो डॉक्टर्स इंजिनियर्स वकील शिक्षक उच्च पदावरील व्यक्ती घडविण्यात मोलाचा वाटा घेतलेला आहे,असे मत विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केल काही विद्यार्थी गुजरात येथे विविध कंपन्यात उच्च पदावर कार्यरत आहेत कोणी पोलिस ऑफिसर कोणी वकील कोणी आरोग्य खाते अशा वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत आहेत यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव श्री पी डी कदम साहेब होते तर प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेत सर्व अध्यापक उपस्थित राहिलेले होते या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी रंगीत प्रिंटर भेट म्हणून दिला अशा प्रकारे दिवसभर विविध उपक्रम घेऊन शेवटी सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पवार एस डी व सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
