चाकूर नवनाथ डिगोळे

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.बाबासाहेबजी पाटील साहेब यांची उपस्थिती
साप्ताहिक आरती दर शनिवारी सायं ०६:३० वा होणार
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चाकुर अंतर्गत मौजे अलगरवाडी येथे काल शनिवार दि.७ जुन २०२५ रोजी प.पु गुरुमाऊली यांच्या आज्ञा व आशिर्वादाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेची मिरवणुक व भव्य पालखी सोहळा टाळ मृदंगाच्या तसेच महाराजांच्या गाण्यावरती अगदी स्वामीमय अशा वातावरणात तल्लीन होवुन पाऊले खेळत गावाला प्रदक्षिणा घालत तेथील साप्ताहिक सेवा केंद्रात महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करुन गावातील मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले..यावेळी या पालखी सोहळ्यास महाराजांची महानैवेद्य आरतीला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी उपस्थिति दर्शवली.याप्रसंगी साहेबांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.त्यानंतर त्याच्या शुभहस्ते महाराजांची आरती करण्यात आली.यावेळी त्यांनी उपस्थित सेवेक-यांशी संवाद साधला.याप्रसंगी अलगरवाडी सेवा केंद्राच्या वतीने शाल,श्रीफळ व महाराजांची फोटो देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर सेवा केंद्राचे जिल्हा प्रतिनिधि सौ.आळणे ताई, विनयभाऊ शिंदे, आदि सेवेकरी यांनी उपस्थित सेवेक-यांना सेवा केंद्राच्या माहिती सह सखोल असे मार्गदर्शन केले.त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी मोठ्या प्रमाणात अलगरवाडी येथील महिला व पुरुष सेवेक-यांनी सहभाग नोंदवला.
